रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णांना वेळेत उपयुक्त असलेल्या अॅम्बुलन्सचा सायरन आता १२० डेसिबलपर्यंत वाजणार आहे. अॅम्बुलन्सना निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी ट्रॅफिकमधून मार्ग काढताना होणारा त्रास यामुळे थोडा कमी होणार आहे. अॅम्बुलन्सचा सायरन ११० ते १२० डेसिबलपर्यंत वाढविण्याची अधिसूचना राज्यसरकारने काढली आहे.