मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगेंनी एकेरी आणि अपशपब्द तसेच खालच्या भाषेत टिका केल्यामुळे राज्य सरकार ज्याने आता पर्यंत सबुरीचे धोरण बाळगले होते. ते आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण पहिल्यांदाच सोमवारी मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यसरकारकडून जवळपास कालपासून 1041 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच रास्ता रोको आंदोलनासाठी लोकांना प्रवृत्त केल्या बद्द्ल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिलेल्या माहितीनुसार, बीड मध्ये मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली व त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.आंदोलकांनी रास्ता रोक आंदोलन केल्यामुळे बीडमधील सामान्य जनतेला वाहतूक कोंडिला सामोरे जावे लागले.