कामं होत नसल्यामुळे शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. याबाबत काल विधानभवनात एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेना विधिमंडळ प्रतोदांची बैठक झाली होती. शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात भाजपच्या संभाव्य उमेदवाराला भाजप ताकद देत आहे. याबद्दल आमदारांनी तीव्र नाराजी नाराजी व्यक्तं केली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत तात्काळ चर्चा करावी, अन्यथा शिवसेना आमदारांची नाराजी वाढत जाऊन त्याचे पक्षासाठी दुष्परीणाम होतील, असं आमदारांचं म्हणणं होतं.त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनीच ही बैठक बोलावली आहे.