शिवसेना नेत्याला हायकोर्टाची तंबी, कोर्टात आमच्या पद्धतीने आणू

मंगळवार, 11 ऑक्टोबर 2016 (13:46 IST)

शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राच्या वादावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टाने चांगलेच सुनावले आहे. हाय कोर्टाने नियमाने त्यांना  दोन वेळा समन्स दिले मात्र शिवसेनेच्या बेफिर्कीर  वृत्ती मुळे राउत  समन्स बजावूनही गैरहजेरी आहे.
 

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद कोर्टात सुरु आहे. . शिवाय कोर्टाच्या समन्सला राऊतांनी उत्तरही दिलं नाही. त्यामुळे कोर्ट प्रचंड चिडले आहे.
 

संजय राऊत हजर झाले नाहीत तर त्यांना कायदेशीर पद्धतीने इथे  आणण्यात येईल असं हायकोर्टानं बजावलं आहे.

17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी उद्धव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने यावर न्यायाधीश पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला आहे. त्यामुळे आता कोर्ट पुढच्या तारखेला काय करते हे पहावे लागेल.

वेबदुनिया वर वाचा