राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाचा अंदाज आहे.
राज्यात सध्या पडत असलेला पाऊस, पूर्व मोसमी असून पुढील पाच दिवस हा पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भ-मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मात्र, हा पाऊस सर्वदूर पडणार नाही. असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. 7 ते 15 जून दरम्यान मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होते. मात्र, 20 मे नंतरच मान्सूनच्या आगमनाची अचूक माहिती वर्तवली जाऊ शकेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.