मुंबईत सयामी जुळ्यांचा जन्म
साईन खान या महिलेने सायन रुग्णालयात एक शरीर आणि दोन तोंडं असलेल्या बाळांना जन्म दिला आहे. एका बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाळाचं तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेला आहे. बाळ आणि बाळंतीण या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. तूर्तास ऑपरेशन केलं तर धोका संभवत असल्यानं यावर संपूर्ण विचार करुन मगच बाळाची सर्जरी केली जाईल. तूर्तास या बाळाला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.