मला दाऊदचा कॉल आलाच नाही : खडसे
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मोबाईलवरुन मला कॉल आलाच नाही, असा पुनरुच्चार महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केला आहे. दाऊद कॉलप्रकरणी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी महसूल खडसेंनी आज पत्रकारांसमोर प्रात्यक्षिक दाखवलं. तंत्रज्ञानाचा वापर करुन तुमच्या मोबाईलवरुन दुसऱ्याचा नंबर वापरुन कॉल करणं शक्य आहे, असा दावा खडसे यांनी केला आहे.
यावेळी खडसेंनी स्वत:च्या मोबाईल फोनवरुन तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराला कॉल केला. पण पत्रकाराच्या मोबाईलवर हा नंबर अंजली दमानियांच्या नावाने डिसप्ले झाला. प्रत्यक्षात अंजली दमानिया किंवा त्यांचा मोबाईल तिथे नसतानाही त्यांच्या मोबाईल नंबरवरुन पत्रकाराला फोन आला. अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करुन हे शक्य असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. तसंच दाऊद कॉल प्रकरणात माझा कोणताही संबंध नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं.