ठाणे जेलमध्ये कैदी ऐशोआरामात

ठाणे- ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना मिळत असलेल्या फाईव्ह स्टार सुविधांबद्दल राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाणे तुरुंगातल्या भ्रष्टाचाराबद्दल एक निनावी पत्र मिळाले होते. यामध्ये कैद्यांना सुविधा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 
 
या पत्रात ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव हे आपल्या निवडक अधिकाऱ्यांसोबत कैद्यांकडून पैसे उकळत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या परिवाराला अधिक वेळ भेटण्यासाठी 25 हजार, पोलिसांच्या कँटीन ड्युटीसाठी 1 लाख रक्कम स्वीकारली जात असल्याचंही या पत्रात म्हटले आहे.
 
याव्यतिरिक्त कैद्यांना मोबाईलवर बोलण्यास परवानगी, अंमली पदार्थ, दारु याचाही जेलमध्ये पुरवठा होत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा