रक्षाबंधनाचा सण हा श्रावणातील पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या बंधनाला प्रेमाच्या धाग्यात बांधतो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून आपल्या संरक्षणाचे बंधन बांधते. त्यालाच आपण राखी असे म्हणतो. राखीचा अर्थ एखाद्याला आपल्या संरक्षणासाठी बांधून ठेवणे, असा आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला सूताच्या धाग्याची राखी बांधून आपल्या जीवनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्याच्यावर सोपविते.