पक्षाच्या धोरणाप्रमाणे भाजपने तिसरा उमेदवार दिला आहे, राज्यसभेची लढत मैत्रीपूर्ण व्हावी इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. भाजपचे राज्यसभेचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनाही शुभेच्छा देतो. मी संयम पाळणारा व्यक्ती असून, उमेदवार देणे किव्हा न देणे हा भाजपचा अधिकार आहे, पण 10 तारखेला मतदान झाल्यानंतर माझा विजय नक्की आहे. असं शिवसेना राज्यसभा उमेदवार संजय पवार यांनी म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे धनंजय महाडिक हे पहिले शिवसेनेचे होते, त्याच्यासाठी मी खूप राबलो होतो. ते माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे आमच्यात कोणतीही कटुता नाही अस देखील संजय पवार यांनी म्हटलं आहे.