मराठी पाककृती : कोबीचे वडे

WD
साहित्य - कोबी - १ वाटी किसुन घ्यावा, कांदा - १ मोठा किसलेला, ोथिंबीर - आर्धा कप बारीक चिरलेली, डाळीचे पीठ - २ वाटी, साखर चवीनुसार, गरम मसाला पावडर - १/२ टी-स्पून, हिरव्या मिरच्या - ४ ते ५, मीठ, हळद, जिरे, तेल - मोहनासाठी १ टी-स्पून व तळण्यासाठी आवश्यकतेनुसार, लिंबू १/२, हिंग - चिमूटभर.

कृती- सर्वप्रथम कोबी व कांदा किसून घ्यावा त्यात मिरच्या, ‍कोथिंबीर, गरम मसाला, हळद, जिरे, डाळीचे पीठ सर्व साहित्य एकत्र करावे, त्यावर लिंबू पिळावे. पाणी वापरू नये. कोबी, कांदा व कोथिंबीर यांचा ओलेपणा पीठ भिजवण्यास पुरेसा असतो. सरसरीत पीठ करून घ्यावे व हाताच्या तळव्यांना किंचित तेल लावून डाळ व वडय़ाप्रमाणे छोटे-छोटे चपटे वडे करून घ्यावेत. गरम तेलात भज्यांप्रमाणे कोबीचे वडे तळावेत आणि गरम सव्‍‌र्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा