राज्यात एकीकडे कमालीची उष्णता वाढत आहे तर दुसरीकडे पाऊस पडणार अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण
अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्णतेची लाट येणार त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.