राहुल तुपे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार सुहास कांबळे (19) व गणेश सोमवंशी गंभीर जखमी झाले आहेत. ओंकार यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार कांबळे आणि त्याचे दोन मित्र दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात असताना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे गेट हॉटेल समोर त्यांच्या दुचाकीला एसटी बसची पाठी मागून धडक लागली. या अपघातात राहुल तुपे याचा मृत्यू झाला. तर ओंकार कांबळे आणि गणेश सोमवंशी गंभीर जखमी झाले.