मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली होती. त्यानुसार, 1 एप्रिल 2023 पासून या महामार्गावरील टोलच्या दरात 18 टक्के वाढ होणार आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील.
कसे असतील नवे दर?
दरम्यान, नवीन टोल दरवाढ लागू झाल्यानंतर प्रवाशांना 50 ते 70 रुपये इतका टोल जास्त द्यावा लागणार आहे. कारचा टोल 270 रुपयांवरून 316 रुपये, बसचा 795 रुपयांवरुन 940 रुपये होईल. ट्रकचा टोल 580 रुपयांवरुन 685 तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे. थ्री एक्सेलसाठी आता 1380 रुपये मोजावे लागतात. नव्या दरानुसार 1630 रुपये मोजावे लागतील. तर एमएक्सेलसाठी 1835 ऐवजी 2165 रुपये टोल द्यावा लागेल.