जमिनीच्या वादातून केबलच्या टॅगने गळा आवळून खून

सोमवार, 12 जुलै 2021 (15:57 IST)
जमिनीच्या वादातून केबलच्या टॅगने एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. इंदापूर तालुक्यात दि.10 ते 11 जुलै 2021 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
प्रभाकर विठ्ठल पवार असे खून झालेल्या व्यक्तिचे आहे. याप्रकरणी राजकुमार वसंत जाधव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानदेव विठ्ठल पवार, शरद ज्ञानदेव पवार आणि सुधीर ज्ञानदेव पवार यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 201, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी जमिनीच्या वादातून प्रभाकर विठ्ठल पवार यांचा केबलच्या टॅगने गळा आवळून खून केला. दाखल फिर्यादीवरून तीन जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती