डिसेंबरनंतर आता राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. याठिकाणी 13.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या आठवड्यात महाराष्ट्रात आणखी गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी पुण्यातील शिरुर याठिकाणी सर्वात कमी 13.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तसेच हवेली (13.4), पाषाण (13.7) एनडीए (13.9), शिवाजीनगर (14.3), माळीण (14.4) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. पुण्यातील अन्य ठिकाणी 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान आहे.दरम्यान, 20 डिसेंबरनंतर उत्तरेकडील थंडगार वारे महाराष्ट्राच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी अति उच्च दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे.