पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा चाकूने निर्घृण खून

सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (14:17 IST)
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा कारवार तालुक्यातील हाणकोण येथे रविवारी निर्घृण खून करण्यात आला. रविवारी पहाटे चार ते पाच हल्लेखोऱ्यांनी त्यांचा खून केला. या हल्ल्यात त्यांची पत्नी जखमी झाली आहे. विनायक काशिनाथ नाईक असे मयत उद्योजकाचे नाव असून त्यांचा इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा व्यापार आहे

. ते आपल्या कारवार तालुक्यात मूळ गावी हाणकोण येथे 10 ते 16 सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या  सातेरी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आले होते. 

रविवारी सकाळी पुण्याकडे निघण्याच्या तयारीत असताना पहाटे 5:30 च्या दरम्यान चार ते पाच अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

पत्नीने वाचविण्याचा प्रयत्न केला असता  त्या देखील या हल्ल्यात जखमी झाल्या. या घटनेची नोंद सदाशिवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती