पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक लागून मृत्यू

बुधवार, 18 मे 2022 (11:35 IST)
भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला ने जोरदार धडक दिल्याची घटना पुण्यात बारामती- मोरगाव रस्त्यावर घडली आहे. या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीच्या धडकेमुळे वयोवृद्ध दूरवर फेकले गेले. या अपघातात वयोवृद्धाचा मृत्यू झाला आहे. मोहन लष्करे असं या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. लष्कर बारामती मोरगाव रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका  मोटरसायकलने त्यांना धडक दिली.अपघातानंतर लष्करे हे जवळपास तीस फुटापर्यंत उडून दूर पडले. पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.या सर्व अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.दुचाकी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती