सॅमसंग इंडियाने गॅलॅक्सी A70 वरून पडदा काढला, जाणून घ्या त्याची किंमत

गुरूवार, 18 एप्रिल 2019 (16:45 IST)
सॅमसंग इंडियाने बुधवारी गॅलॅक्सी A70 वरून पडदा हटवला, जे पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात लॉन्च होईल. कंपनीच्या लोकप्रिय गॅलक्सी ए सिरींजमधील हा सहावा स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत 28,990 रुपये ठेवली आहे आणि 20 ते 30 एप्रिल दरम्यान प्री-बुकिंगद्वारे याची बुकिंग केली जाऊ शकते. 
 
या डिव्हाईसमध्ये 6.7 इंच एफएचडी प्लस सुपर अमोलड डिस्प्ले, क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह 512 जीबी क्षमताचे मायक्रो-एसडी स्लॉट असेल. कंपनीने एका वक्तव्यात म्हटलं की ज्या ग्राहकांनी प्री-बुक केले आहे, ते सॅमसंग यू फ्लेक्स फक्त 999 रुपयांत खरेदी करू शकतात. यू फ्लेक्स हा एक प्रिमियम ब्लूटुथ डिव्हाईस आहे, ज्याची वास्तविक किंमत 3,799 रुपये आहे.
 
सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य विपणन अधिकारी रंजीवजीत सिंह म्हणाले, "आमच्या अलीकडे लॉन्च केलेल्या गॅलॅक्सी A सिरींजला लॉन्चपासूनच अभूतपूर्व यश मिळालं आहे. लॉन्च झाल्याच्या फक्त 40 दिवसांतच 50 कोटी डॉलर्स किमतीची एक ऐतिहासिक विक्री स्थापन केली आहे."
 
A70 मध्ये 32-मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरासह 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी सूपरफास्ट चार्जिंग क्षमतेसह सुसज्ज आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती