फोनचे स्पेसिफिकेशन या प्रकारे असू शकतं: OnePlus 7 ला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि किमान 6 जीबी रॅमसह लॉन्च केलं जाईल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. ट्रिपल रियर कॅमेरा आणि 3X झूम असेल. यात वायरलेस चार्जिंग बहुतेकच असणार. सूत्रांप्रमाणे वनप्लसमध्ये 3.5 एमएमचे हेडफोन जॅक मिळणार नाही. वनप्लस 7 प्रो मध्ये 5जी ची सुविधा मिळेल. फोनमध्ये क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये 4000mAh ची बॅटरीसह 30 वॉटचे चार्जर मिळेल.
वनप्लस 7 ची किंमत $569 अर्थात सुमारे 39,690 रुपये असेल आणि वनप्लस 7 प्रो ची 6GB+128GB ची किंमत 699 यूरो अर्थात 54,670 रुपये असू शकते.