सिनेमा, डॉक्युमेंट्रीतील राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची गरजेचे नाही

मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (16:54 IST)
सिनेमा किंवा डॉक्युमेंट्रीमध्ये जर राष्ट्रगीत सुरु झालं, तर उभं राहण्याची गरज नाही, असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. मात्र थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं लागेल, असंही कोर्टाने म्हटलं आहे.याशिवाय राष्ट्रगीताला उभं राहावं की नाही याबाबत चर्चा आवश्यक असल्याचं मतही कोर्टाने नोंदवलं. राष्ट्रगीताला उभं राहण्याबाबत सध्यातरी कोणताही कायदा नसल्याचं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा