ड्रोन पाहून लोकांमध्ये घबराहट पसरली,घरातील दिवे बंद केले

शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (12:25 IST)
मणिपूरच्या हिंसाचाराच्या घटनांत  वाढ होत आहे. आता अतिरेकी रॉकेट आणि ड्रोनने हल्ला करत आहे. चुराचंदपूर लगत बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी 10 तासांत अतिरेक्यांनी 10 तासांत दोन रॉकेट हल्ले केले. या परिसरात अनेक ड्रोन उडताना दिसले.लोकांमध्ये घबराहट पसरली त्यांने घरातील दिवे बंद केले. 

नुकतेच इंफाळ पश्चिम जिल्ह्यात दोन ठिकाणी ड्रोन आणि बॉम्बने हल्ला करण्यात आला. ड्रोन दिसल्यानंतर मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील नारायणसेना, नंबोल कमोंग आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील पुखाओ, डोलैथाबी, शांतीपूर भागातील लोक घाबरले आहेत. परिस्थिती पाहता सुरक्षा दल हाय अलर्टवर आहे.

शुक्रवारी रात्री बिष्णुपूर जिल्ह्यातही अनेक लाइटिंग राउंड फायर करण्यात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री मरिमबम कोईरेंग सिंग यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांचा पुतळा आणि घराचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. डोंगराळ भागात केंद्रीय दले तैनात आहेत,
समन्वय समितीने मणिपूरमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. आम्ही लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती