राहुल गांधी यांच्या हाती लवकरच काँग्रेसची सूत्रे

शनिवार, 15 एप्रिल 2017 (11:07 IST)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हातात लवकरच काँग्रेसची सूत्रे घेण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील असे सूत्रांनी सांगितले आहे. राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास उत्सुक असून प्रक्रियेनुसारच ते अध्यक्ष होतील, असे एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. ऑक्टोबर महिन्यामध्ये काँग्रेस नेत्याने सांगितले. ऑक्टोबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडूक होणार आहे. त्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी हे प्रबळ दावेदार असतील. सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. गेल्या 19 वर्षांपासून त्या या पदावर आहेत. त्या आता विश्रांती घेतील आणि राहुल गांधी हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील असे त्यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद हाती घ्यावी अशी काँग्रेस समितीच्या पदाधिकार्‍यांची इच्छा आहे.    

वेबदुनिया वर वाचा