पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजे तीन वर्षांनी उद्धव ठाकरे मोदी-शाहांना दिल्लीत भेटतील. याआधी एनडीएचं सरकार असताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कधी मुंबईत आले तर ते आवर्जून मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घ्यायचे. पण मोदी-शाहांच्या युगात चित्र बदलत गेलं. मोदी आणि उद्धव ठाकरेंची किमान काही सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी भेट झाली. पण उद्धव ठाकरे आणि अमित शाह हे तर तब्बल तीन वर्षांनी आमने-सामने असतील.