अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांचा सामना करत असलेले जनता दल-सेक्युलर (जेडी-एस)चे निलंबित नेते प्रज्वल रेवन्ना शुक्रवारी पहाटे जर्मनीहून येथे आले, त्यानंतर काही मिनिटांतच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांना अटक केली. एसआयटीने खासदार प्रज्वल रेवन्ना (३३) यांना केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर म्युनिकहून बेंगळुरूला परतताच अटक केली. प्रज्वलला तपासासाठी सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणण्यासाठी विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.