PM Modi Gujarat Visit:पंत प्रधान मोदींचा आज गुजरात दौरा, नॅनो युरिया प्लांटचे उद्घाटन करणार

शनिवार, 28 मे 2022 (10:30 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते तेथे नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाला भेट देतील आणि सहकारी संस्थांच्या नेत्यांच्या चर्चासत्राला संबोधित करतील. नॅनो युरिया (लिक्विड) प्लांटचे उद्घाटनही ते करणार आहेत. 
 
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, शनिवारी सकाळी 10 वाजता पंतप्रधान राजकोटमधील अटकोट येथे नव्याने बांधलेल्या मातुश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देतील. यानंतर पंतप्रधान येथे जाहीर सभेला संबोधित करतील. 
 
पंतप्रधान मोदी दुपारी 4 वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिरात ‘सहकार ते समृद्धी’ या विषयावर सहकारी संस्थांच्या नेत्यांच्या चर्चासत्राला संबोधित करतील. पंतप्रधान इफकोच्या नॅनो युरिया (लिक्विड) प्लांटचे उद्घाटन करतील. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती