फतवा : पुरूषांचे फूटबॉलचे सामने मुस्लीम महिलांनी बघू नये

बुधवार, 31 जानेवारी 2018 (09:38 IST)

लखनौ येथील दारूल उलूमच्या एका ज्येष्ठ मुफ्तींनी पुरूषांचे फूटबॉलचे सामने मुस्लीम महिलांनी बघू नयेत असा फतवा काढला आहे. अर्ध्या पँटमध्ये पुरूष फूटबॉल खेळतात, त्याखाली त्यांचे शरीर उघडे असते, अशा पुरूषांना बघणे इस्लामच्या शिकवणुकीविरोधात असल्याचे मुफ्ती अथार कासमी यांनी म्हटले आहे. मुस्लीम महिलांनी त्यामुले पुरूषांचे फूटबॉल सामने बघू नयेत असा फतवा त्यांनी काढला आहे. दारूल उलूम ही उत्तर प्रदेशातील देवबंद शहरातली सुन्नी मुस्लीमांची आशियातली सगळ्यात मोठी धार्मिक संस्था असून कासमी हे तिथं मुफ्ती असल्यामुळेच त्यांच्या या अशा विचित्र फतव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जे नवरे आपल्या बायकांना टिव्हीवर फूटबॉलचे सामने बघू देतात, त्यांच्यावर देखील कासमी यांनी टीका केली आहे. तुम्हाला काही लाज वाटते की नाही? तुम्ही देवाला घाबरता री नाही? असा सवाल विचारत बायकांना असं काही बघूच कसं देता असा जाबच त्यांनी समस्त मुस्लीम नवरे मंडळींना विचारला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती