कोटा (राजस्थान) हा देशातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठ्या महामार्गास जोडणारा कोटा येथील हँगिंग ब्रिज. ३१ मे रोजी याचे काम पूर्ण होईल. गेल्या काही वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचे काम पूर्ण होईल. यानंतर गुजरातच्या पोरबंदर पोर्टवर उतरणारे साहित्य विना अडथळे ७ राज्यांत पोहोचेल.
३३०० किमी लांबीच्या महामार्गाचे अंतर कापण्यास ५८ तास लागतील. हा कॉरिडॉर १४ राष्ट्रीय महामार्गास जोडणार आहे. यामुळे २८ मोठी शहर जोडली जातील. गुजरातच्या पोरबंदर, राजकोट, समाखियाली, राधनपूर, राजस्थानातील माउंटअबू, उदयपूर, चित्तोडगड, कोटा, मध्य प्रदेशातील शिवपुरी, उत्तर प्रदेशातील झाशी, अकबरपूर, कानपूर, लखनऊ, अयोध्या, गोरखपूर, बिहारच्या मुजफ्फरपूर, सिलीगुडी, जलपायगुडी अलिपूरद्वार तसेच आसामच्या दिसपूर, डाबका, लुमडिंग, हाफलाँग आणि सिलचर यांचा समावेश आहे.