गहलोत यांनी बोलताना सांगितले की, मी आजपर्यंत कोणाच्याही दबावाखाली काम केलं नाही. पण मी सध्या असे ऐकत आहे की मी सीबीआयच्या दबावाखाली हे केलं. हे चुकीचे आहे. हा माझा निर्णय एकदिवसाचा नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर हजारो लोक एका विचारधारेत सामील झाले. राजकारणात माझा येण्याचा उद्देश्य जनतेची सेवा करणे असून ज्या कारणास्तव मी आप पक्षात सामील झालो ते त्याच्याऱ्हास पाहून मी थक्क झालो.
हे मत फक्त माझ्यापुरती मर्यादित नसून आमआदमी पक्षाचे इतर कार्यकर्त्ये देखील असाच विचार करत आहे. एखादे सरकार जर सतत केंद्र सरकारशी भांडत असेल तर हे चुकीचे आहे. अशाने दिल्लीचा विकास कसा होणार? या पेक्षा अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा. दिल्लीच्या विकासासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करता यावे यासाठी मी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान मोदींच्या धोरणांनी मी प्रभावित झालो आहे.
दिल्ली सरकारमध्ये ते परिवहन मंत्री होते. दरम्यान, कैलाश गेहलोत यांच्याविरोधात ईडी आणि आयकर प्रकरणे प्रलंबित असल्याचे आम आदमी पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्यावर ईडी आणि इन्कम टॅक्सने अनेकदा छापे टाकले आहेत. अशा परिस्थितीत हा छापा टाळण्यासाठी त्यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हा भाजपचा घाणेरडा कारस्थान आहे. ईडी आणि सीबीआयच्या जोरावर भाजपला दिल्लीची निवडणूक जिंकायची आहे.