Video महिलेला बाजारपेठेत कारने ओढले, काही मीटर बोनेटवर लटकलेली होती

गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (13:51 IST)
राजस्थानमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. हनुमानगड मार्केटच्या मध्यभागी एका चालकाने महिलेवर कार चढवण्याचा प्रयत्न केला. महिला कारसमोर येताच ड्रायव्हरने तिला अनेक मीटरपर्यंत ओढून नेले.
 
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. ज्यामध्ये अनेक लोक त्या महिलेला वाचवताना दिसत होते.
 
कारच्या बोनेटवर लटकलेली महिला
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला समोरून येते आणि कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र ड्रायव्हर न थांबता महिलेला कारचा बोनटवर लटकवतो आणि कार काही मीटर दूर घेऊन जातो.
 
घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 

सत्ता के संरक्षण में बदमाशों ने थामी अपराध की स्टेयरिंग !

राजस्थान के हनुमानगढ़ में दिनदहाड़े बदमाश कार के बोनट पर एक महिला को घसीट रहे हैं। गहलोत जी, रोज़ाना सरेआम जब ऐसी वारदात महिलाओं के साथ हो रही हैं तो क्या आपको अंदाज़ा भी है कि पूरे राजस्थान में आपके कुशासन में महिलाओं का… pic.twitter.com/ZvoyTRPuiI

— Col Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) August 16, 2023
एफआयआर नोंदवला, तपास सुरू
पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की त्यांना मीडिया रिपोर्ट्सद्वारे या घटनेची माहिती मिळाली. ते म्हणाले की हनुमानगडमध्ये चालत्या कारच्या बोनेटवर एक महिला असल्याची माहिती मिळताच आम्ही सीसीटीव्ही व्हिज्युअलद्वारे याची पुष्टी केली. 
 
ते म्हणाले की कार चालक आणि महिलेबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे, पुढील तपास सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती