हावडा मेलच्या जनरल डब्यात स्फोटात चार जखमी

रविवार, 3 नोव्हेंबर 2024 (16:50 IST)
पंजाबमधील फतेहगढ जिल्ह्यातील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ हावडा मेलच्या जनरल क्लासच्या डब्यात झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. सरकारी रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) अधिकाऱ्यांनी रविवारी सदर  माहिती दिली.
 
अधिका-यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास अमृतसरहून हावडाकडे जाणाऱ्या ट्रेनच्या डब्यात फटाक्यांनी भरलेल्या प्लास्टिकच्या बादलीचा स्फोट झाला. या घटनेत एका महिलेसह चार प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. प्राथमिक माहितीत आढळले की रेल्वेतील जनरल क्लासच्या डब्यात एका प्लास्टिकच्या बादलीत फटाके ठेवण्यात आले आहे. घटनेचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती