धमतरीच्या निषाद समाजाने सर्वसहमतीने निर्णय घेतला आहे की ज्या घरात शौचालय नसेल, तिथे समाजातील कोणताही व्यक्ती आपल्या मुलीचं लग्न करवणार नाही. समाजाचे अध्यक्ष लीलाराम निषाद यांनी सांगितले की बैठकीत सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करताना हा प्रस्ताव आला की योग्य मुलाच्या घरी शौचालय नसल्यास मुलीकडील पक्ष त्या घरात आपल्या मुलीचा विवाह करणार नाही.