'वायू' चक्रीवादळ गुजरातला धडणकणार होतं, वादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. यामुळे 'वायू' चक्रीवादळाचा धक्का थेट गुजरातला बसणार नाही तरी समुद्र किनाऱ्यावर मात्र परिणाम दिसून येणार आहे.
गुजरातच्या समुद्रकिनार्यावर एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असून हाय अलर्ट जारी केले गेले आहेत. याचा प्रभावामुळे दोन दिवस कोकण आणि गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून लोकांना समुद्री किनार्यावर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. मच्छिमारांना देखील सतर्कचा इशारा केला गेला आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे. कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.