पृथ्वीराज चव्हाण म्हणतात चार वर्षांपासून राहुल गांधींची भेट झाली नाही

शुक्रवार, 3 जून 2022 (07:59 IST)
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी चार वर्षांपासून राहुल गांधींची भेट झाली नाही म्हणत नाराजी दर्शवली आहे. ते म्हणाले की उदयपूरमध्ये चिंतन किंवा आत्मपरीक्षण असे काही झाले नाही.
 
दिल्लीला गेल्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटतो, पण आता त्यांची प्रकृतीही ठीक नाही. मात्र, जेव्हा त्यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली तेव्हा ती मिळाली. मात्र, गेल्या चार वर्षांत राहुल गांधींसोबत एकही भेट झालेली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
 
चिंतन शिबिरात पक्षाच्या विविध मुद्यांवर चर्चा केली जाईल असे काँग्रेस अध्यक्षांनी ठरवले होते. मात्र, चिंत किंवा आत्मपरिक्षण करण्याची गरज नसल्याचे कुणीतरी ठरवले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नंतर उदयपूर सभेला नव संकल्प शिबिर असे ना देण्यात आले. आसाम आणि केरळमधील पराभवाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवालालाही कचरापेटी दाखवल्याचे यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच भाजपच्या हिंदुत्वापुढे काँग्रेसची मवाळ हिंदुत्वाची रणनीती फोल ठरली असून त्यामुळे काँग्रेसला उत्तर प्रदेशात मुस्लिम मते मिळालेली नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती