या घटनेत तक्रारकर्त्या पुरुषाचे पाच महिन्यांपूर्वीच सदर महिलेशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर त्याला व त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या बायकोच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास देखील नकार देऊ लागली. तसेच नवऱ्याच्या गैरहजेरीत त्याची बायको सतत त्याच्या चुलत बहिणीच्या घरी जात असल्याचे त्यांना कळले. एक दिवस पत्नीचा पाठलाग करून नवरा व त्याचे कुटुंबीय बहिणीच्या घरी पोहोचले तेव्हा त्या दोघींना त्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचे त्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले आहे.