मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मथुरा दौऱ्यावर आहेत. योगी मंगळवारी सकाळी श्रीकृष्ण जन्मस्थानी दर्शनासाठी पोहोचले. येथे त्यांनी गर्भगृह, ठाकूर केशव देव मंदिर, योगमाया मंदिराला भेट दिली. मुख्यमंत्री सुमारे 15 मिनिटे येथे थांबले. यानंतर जन्मभूमी आवारातील भागवत भवनात गेले. तेथे त्यांनी राधा-कृष्णाची पूजा केली.नंतर त्यांनी बरसाना येथे राधारांनी मंदिरात जाऊन सकाळी पूजा केली.