मधुमेह आजारी परीक्षेत खाऊ शकतात स्नेक्स

टाइप-1 मधुमेह आजारी विद्यार्थी आता सीबीएसई च्या दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेदरम्यान स्नेक्स खाऊ शकतात.
 
सीबीएसई ने एका सर्कुलरमध्ये म्हटले की टाइप-1 मधुमेह आजारी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून रक्तात ग्लूकोजचे स्तर संतुलित ठेवण्यासाठी त्यांना नियमित अंतराळात इंसुलिन घेण्याची गरज भासते. या मुलांना हायपोग्लाइसीमियाहून बचावासाठी सतत काही खाण्या-पिण्याची गरज असते. असे विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये शुगर टॅबलेट, फळं, स्नेक्स आणि पाणी घेऊन जाऊ शकतात जे निरीक्षकांजवळ ठेवण्यात येईल.
 
तसेच सीबीएसई ने म्हटले आहे की यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित शाळेच्या प्रिंसिपलला मेडिकल प्रमाण पत्र पाठवावे लागेल.

वेबदुनिया वर वाचा