बँकेत मतदानाची शाई वापरू नका - EC

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (13:18 IST)
नुकतेच नोटा बदलण्यासाठी लोकांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी बोटावर शाई  लावायला सुरुवात करण्यात आली. आता यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. मतदान केल्याची खूण म्हणून बोटांवर लावली जाणारी शाई बँकांमध्ये वापरु नका असे निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. पुढच्या काही महिन्यात अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही चिंता व्यक्त केली. एकदा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरीकाने पुन्हा दुस-यांदा मतदान करु नये यासाठी बोटांवर शाई लावली जाते.   
 

वेबदुनिया वर वाचा