अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (17:00 IST)
आम आदमी पार्टीचे नेते आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री बनल्या आहे. 

राज निवास येथे आज दुपारी साडेचार वाजता शपथविधी सोहळा पार पडला. आतिशी यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सीएम आतिशी यांच्यासोबत ज्या पाच मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात चार जुने मंत्री गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन यांच्या नावाचा समावेश आहे,

या सर्वांशिवाय सुलतानपूर माजरा आमदार मुकेश कुमार अव्हालत हे आतिशी यांच्या मंत्रिमंडळात नवीन चेहराअसून त्यांनी मंत्री म्हणूनही शपथ घेतली. आतिशी यांच्या शपथविधीला अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी आतिशी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी आले होते आणि त्यांच्यासोबत राजभवन पोहोचले होते. आतिशीपूर्वी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित याही दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांच्यानंतर आतिशी पुढील महिला मुख्यमंत्री बनल्या असून त्यांनी दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

मुख्यमंत्री होणाऱ्या आतिशी यांच्याकडे दिल्ली सरकारची काही महत्त्वाची खातीही असतील. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती