मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याचा मृतदेह सापडला तेव्हा बिबट्याचे डोके पाण्याखाली होते. शरीरावर कोठेही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. प्राथमिक तपासानुसार बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच संपूर्ण माहिती मिळेल. 'पवन'च्या मृत्यूनंतर कुनो नॅशनल पार्कमध्ये आता 24 बिबट्या शिल्लक आहेत, ज्यात 12 प्रौढ आणि 12 शावकांचा समावेश आहे.