योगी मंत्रीमंडळात नाराजी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीच सरकारच्या कामकाजावर नाराज आहेत. कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी 4 जुलैपासून सरकारविरोधात धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
 
ओमप्रकाश राजभर भाजपचा मित्रपक्ष भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत. कुटुंबातील एखादा सदस्य ऐकत नसेल तर त्यासाठी काही तरी करावंच लागतं. समाजवादी पार्टीच्या काळातील अधिकारी आमचं ऐकत नाहीत. जनतेने आम्हाला त्यांना न्याय देण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी मत दिलं आहे. सरकारविरोधात नव्हे, तर जिल्हाधिकाऱ्याविरोधात आंदोलन करणार असल्याचं ओमप्रकाश राजभर यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा