वसतिगृहात विजेचा धक्का लागून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (11:41 IST)
मध्य प्रदेश मधील धार जिल्ह्यात सरकारी वसतिगृहात विजेचा धक्का लागल्याने दोन आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे राज्य सरकार ने बुधवारी वसतिगृहाचे अधीक्षक आणि आदिवासी कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना निलंबित केले आहे. व या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. अधिकारींनी सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री अनुसूचित जातीजमाती कल्याण विभाग व्दारा संचालित वरिष्ठ वसतिगृहात घडली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार "पाण्याच्या टाकीत विजेचा तार पडलेला होता. तसेच 17 वर्षीय दोन विद्यार्थी पाणी घेण्यासाठी टाकी जवळ आले. व पाण्यात हात टाकताच दोघांना विजेचा धक्का लागला.तसेच तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 
 
 
मध्य प्रदेशचे आदिवासी कार्य मंत्री विजय शहा यांनी अधिकारींना या प्रकरणाचा कसून तपास करायला लावला असून दोषींविरुद्ध केस नोंदवण्यास सांगितले आहे. तसेच अशी घटना पार्ट घडायला नको म्हणून खबरदारी घेण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये देण्याची मदत घोषित केली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती