शिरडी: श्रीरामनवमी उत्सवानिमित्त तीन दिवसांत साई दर्शनासाठी शिरडीत आलेल्या भाविकांनी बाबांच्या दानपेटीत तब्बल दोन कोटी रूपयांचे दान टाकले. शिवाय 222 ग्रॅम सोने व अडीच किलो वजनाच्या चांदीच्या वस्तूदेखील अर्पण केल्या.
उत्सव काळात स्थानिक बाजारपेठेत मात्र फारशी उलाढाल झालेली नाही. दर्शनाबारीतील गर्दी नजरेत भरणारी होती. भाविकांची गर्दी कायम असताना, स्थानिक व्यावसायिकांना मात्र मंदीचे चटके सहन करावे लागत आहेत.