भारताने काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर अतिरेकी आणि जवानामध्ये चकमक सुरू आहे. जम्मू येथील काश्मिर भागातील झकुरा भागात अतिरेक्यांनी जवानांच्या कॅम्पवर हल्ला केला आहे . जवानांच्या पेट्रोलिंग व्हॅनवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता . जवानांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. तर या भागातील असलेल्या सर्व भागत सर्च ऑपरेशन सुरू केल आहे. याच आठवड्यात पम्पोरामध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर आता भारत पुन्हा मोठा हल्ला करेल अशी भीती पाकिस्थानला लागली आहे.