नवी दिल्ली- देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारावर स्तुतिसुमने उधळली आहेत. देशातील जनतेने ज्या विश्वासाने मोदी सरकारला निवडून दिले होते तो विश्वास सरकारने सार्थ ठरवला आहे. सरकारचे काम अपेक्षेपेक्षा चांगले चालले आहे, असे अडवाणी म्हणाले.