भारतात पुन्हा पोलिओचा व्हायरस सापडला

बुधवार, 15 जून 2016 (15:57 IST)
2010 नंतर पोलिओचा एकही व्हायरस आढळला नव्हता. मात्र गटाराच्या पाण्यातून पोलिओचा व्हायरस सापडलामुळे हादरलेल्या तेलंगणा सरकारने याविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या व्हायरसचं नाव व्हीडीपीव्ही टाईप-2 आहे. गटाराच्या पाण्याची चाचणी केल्यानंतर या व्हायरसचा खुलासा झाला आहे. तेलंगणाच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव राजेश्वर तिवारी यांनी सांगितलं की, “आम्ही हैदराबाद आणि रंगा रेड्डी जिल्ह्यात 20 ते 26 जून या काळात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यादरम्यान सहा आठवड्यांपासून 3 वर्षांपर्यंतच्या बाळांची तपासणी केली जाईल.”

वेबदुनिया वर वाचा