पुरावे देणार नाही : मनोहर पर्रिकर

आग्रा- सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणार्‍यांच्या विश्वासार्हतेवर भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सर्जिकल स्ट्राइकचे कोणतेही पुरावे देण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करतानाच त्यांनी हे 100 टक्के अचूक सर्जिकल स्ट्राइक्स होते, असे सांगितले.
 
सर्जिकल स्ट्राइक्सभोवती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य काही नेत्यांनी संशयाचे धुके उभे केले आहे. सर्जिकल स्ट्राइक्सच्या पुराव्यांची मागणी त्यांनी केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर पर्रिकर यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा