महत्त्वाचे म्हणजे काल मीडियाहून आलेल्या वृत्तानुसार पळपुटा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याला आपले पाय गमवावे लागणार आहे. पायाला गँगरीन झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, गँगरीन पासून वाचण्यासाठी पाय कापणे हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर असल्याचे वृत्त आहे.
दाऊदवर सध्या कराचीच्या लिकायत नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून सूत्रांप्रमाणे दाऊदच्या पायाचे गँगरीन अगदी शेवटच्या टोकाला पोहोचले आहे. त्यामूळे दाऊदचा जीव वाचवायचा असेल तर, पाय कापणे हे इतकेच आमच्या हाती असल्याचे दाऊदच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.