सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एकच्या सुमारास दहशतवादी आणि आसाम रायफल्स यांच्यात झालेल्या चकमकीत सहा जवानांना वीरमरण आले. या हल्ल्यात ज्युनिअर कमांडिंग ऑफिसर (जेसीओ) सह पाच ‘29 आसाम रायफल्स’ जवानांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी हा नियोजित केलेला हल्ला असून दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जवानांकडील ‘एके 47’ रायफल्स, एक इंसास रायफल्स, एक एलएमजी रायफल्स आणि दारुगोळा पळवला आहे. हे दहशतवादी कॉरकॉम दहशतवादी संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी टिटरवरुन दु:ख व्यक्त केले. चंदेली जिल्ह्यात याच परिसरात गेल्यावर्षी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते.