जम्मू आणि काश्मीरमध्ये आज मंगळवारी मतमोजणी होत आहे. पाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये विक्रमी मतदान झाले आहे.
सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून एक तासात निकालाचे कल येणार आहेत. मतमोजणी केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जम्मू -काश्मीरमध्ये 87 जागांसाठी मतदान झाले असून 1987 नंतर प्रथमच विक्रमी मतदान झाले आहे. दहशतवादाने त्रस्त असलेल्या या राज्यात सर्वत्र चौरंगी लढती होत्या. अलगतावादी व दहशतवाद्यांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाकडे मतदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.